२५ वर्षांपुर्वी गायब झाला अभिनेता, बायकोनं दुसऱ्यासोबत थाटला संसार; आता वेड्यांच्या दवाखान्यात केलं दाखल

राज किरण महतानी एक असा अभिनेता होता जो बॉलीवूडमध्ये आपल्या कामासाठी ओळखला जात होता, पण असे काय झाले की तो अचानक गायब झाला आणि गेल्या 24-25 वर्षांपासून त्याचा कोणताही पत्ता नाही. त्याच्या घरच्यांनाही त्याची माहिती नाही. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूड अभिनेत्याची गोष्ट सांगतो, जो एकेकाळी इंडस्ट्रीचा चमकणारा स्टार होता, पण तो स्टार आज कुठे आहे याचे निश्चित उत्तर कोणाकडेच नाही. त्याचे कुटुंबीयही त्याचा शोध घेत आहेत.

मुंबईत एका सिंधी कुटुंबात जन्मलेल्या राजने 1975 मध्ये आलेल्या बीआर इशारा यांच्या ‘कागज की नाव’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि 1980 च्या दशकात 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून त्यानी आपल्या करिअरची उंची गाठली होती. त्याने बॉलिवूडचे अनेक सुपरहिट चित्रपटही दिले. इतकेच नाही तर तो त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत मुख्य भूमिकेसह सहायक भूमिकांमध्ये काम करताना दिसला.

राजच्या पत्नीचे नाव रूपा होते, पण आता तिने दुसरे लग्न केले आहे आणि आता तिचे नाव रूपा मश्रुवाला झाले आहे. याशिवाय राज यांना ऋषिका महतानी आणि मन्नत महतानी या दोन मुली आहेत. त्यांची मुलगी ऋषिका तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी एक पोस्ट करते.

ऋषिका ही व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर असून तिचे नुकतेच लग्नही झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ऋषिका आणि मन्नत अजूनही त्यांच्या वडिलांना शोधत आहेत. वडिल वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

पण, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की राज किरण त्याच्या कारकिर्दीत पिछाडीवर गेल्यानंतर गंभीर नैराश्यात गेला. नंतर त्याला मुंबईतील भायखळा मेंटल एसायलममध्ये दाखल करण्यात आले. तो इंडस्ट्रीतून गायब झाला आणि अनेक वर्षांपासून तो अमेरिकेत एकांतवासात राहत असल्याचे मानले जात होते.

त्याच वेळी, जून 2011 मध्ये, ऋषी कपूरने बेपत्ता अभिनेत्याचा भाऊ गोविंद महतानी याला फोन केला, ज्याने त्याला सांगितले की अभिनेता अटलांटा येथे वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये आहे, जिथे तो एका मानसिक आजारमुळे राहत होता. अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. त्याच वेळी, 2011 मध्ये त्यांची मुलगी ऋषिकाने एक सार्वजनिक निवेदन जारी करून राज किरण अटलांटामध्ये सापडल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते.

ती म्हणाली की ती आणि तिचे कुटुंब न्यूयॉर्क पोलिस आणि खाजगी गुप्तहेरांच्या मदतीने तिच्या वडिलांचा अनेक वर्षांपासून शोध घेत होते. कागज की नाव (1975), शिक्षा (1979), मान अभिमान (1980) आणि एक नया रिश्ता (1988) तसेच कर्ज (1980), बसेरा (1981), अर्थ (1982) यांसारख्या चित्रपटांमध्ये ते मुख्य भूमिकेत दिसले.

राज टिळक (1984), आणि वारीस (1988) यांसारख्या चित्रपटांमधील सहाय्यक भूमिकांसाठी त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले. तो अनेकदा रोमँटिक आणि दयाळू नायक म्हणून टाइपकास्ट झाला होता. ‘कर्ज’ चित्रपटातून त्याला जबरदस्त ओळख मिळाली.