राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड त्यानंतर अजित पवारांचे बंड यामुळे राजकारणात मोठे बदल झाले आहे. अशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही जवळ येत आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांमध्ये कोण बाजी मारणार यांची चांगलीच चर्चा होत असते. अशात एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणूकीत ४८ मतदार संघांपैकी ४० ते ४५ जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळेल, अशी माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर हा सर्व्हे करण्यात आला आहे.
काँग्रेसने एक अंतर्गत सर्व्हे केला आहे. त्यांनी ४८ मतदार संघात जाऊन ग्राऊंड रिऍलिटिचा आढावा घेतला आहे. या सर्व्हेमधून भाजपला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना ४० ते ४५ जागा मिळणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे. सर्व्हे करताना आम्ही राज्यातील ४८ मतदार संघात जाऊन तेथील सर्व गोष्टींचा आढावा घेतला होता. त्यानुसार आम्ही वॉर्डामध्ये तयारी सुरु केली आहे. आम्हाला भाजपला सर्व पातळ्यांवरुन काढून टाकायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
तसेच नाना पटोले यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवरही भाष्य केलं आहे. काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल कोणताही संभ्रम नाही. तो फक्त जनतेत संभ्रम आहे. शरद पवार हे मोठे नेते असून त्यांची भूमिका घेण्यासाठी ते सक्षम आहे. तसेच भेटीनंतर त्यांनी भूमिकाही स्पष्ट केली आहे. ते इंडिया आघाडीसोबतच राहणार आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.