अजित पवारांचा ‘तो’ आरोप अखेर शरद पवारांनी केला मान्य, म्हणाले…

अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सहभागी होण्याची निर्णय घेतला आहे. भाजप-शिवसेनेसोबत हात मिळवत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यानंतर त्यांनी ५ जूलैला एक मेळावा घेतला होता.

अजित पवारांनी मेळाव्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांवर अनेक आरोप केले आहे. भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांनी तीन वेळा चर्चाही केली होती, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.

आता शरद पवार यांनी हा आरोप मान्य केला आहे. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत शरद पवारांना विचारण्यात आले होते. त्यावर भाजपसोबत जाण्याच्या आरोपांवर त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी तो आरोप मान्यही केला आहे.

२०१४, २०१७ आणि २०१९ या तिन्ही साली भाजपसोबत युतीची चर्चा झाली होती. पण चर्चा करण्यात काय गैर आहे? चर्चा हा लोकशाहीचा एक भाग आहे. पण विचारधारा वेगवेगळी असल्याने चर्चा पुढे गेली नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी शरद पवारांना घरी बसा असे म्हटले होते. त्यावरही शरद पवारांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मी अजूनही पक्षासाठी काम करत आहे. माझ्याकडे कोणतंही मंत्रिपद नाही. मला रिटायर होण्याचा सल्ला देणारे हे कोण आहे. मी अजून म्हातारा झालेलो नाही.

अजितला मी चारवेळा उपमुख्यमंत्री केलं. प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद दिलं. पीए संगमा यांच्या कन्येसह अनेकांना मंत्रिपदं दिली. पण सुप्रियाला मी कधी मंत्रिपद दिलं नाही. ही काय घराणेशाही आहे का? असा सवाल विचारत शरद पवारांनी अजित पवारा्ंना खडेबोल सुनावले आहे.