अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसचे पडले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार पुन्हा पक्ष बांधनीला लागले आहे. ते आता राज्यभराचा दौरा करणार आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पहिल्यांदाच नाशिकला पोहचले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना आता त्यांनी भुजबळांच्या मतदार संघात पहिली सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.
काही जणांनी सांगितलं, पवारांनी नाव दिलं म्हणून आम्ही निवडून दिलं. एकदा दोनदा नाही तर तीन वेळा निवडून दिलं. नावं कधी चुकली नाही, पण एका नावाने घोटाळा, असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.
तसेच मी इथे कोणाचं कौतूक करायला आलेलो नाही. मी तुमची सर्वांची माफी मागायला आलो आहे. माझा अंदाज कधी चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला, असे म्हणत शरद पवारांनी मतदार संघातील लोकांची माफी देखील मागितली आहे.
माझ्या विचारांवर तुम्ही निकाल दिले, त्यामुळे तुम्हालाही यातना झाल्या. तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला तर तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य आहे. कधीतरी लोकांच्या समोर येण्याची वेळ येईल. पण मी पुन्हा ही चूक करणार नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
सभेत बोलत असताना शरद पवारांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. वय झालंय आता घरी बसलं पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, वय आणि व्यक्तिगत टीका करु नका. वयं झालंय पण निवृत्त व्हा हे म्हणू नका.