घरात बंद होते १६ कुत्रे, सोबतच रहायची महिला; ३ वर्षांनी दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने फ्लॅटमध्ये 16 कुत्रे बंद करून ठेवले होते. ती महिलाही कुत्र्यांसोबत तेथे राहात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एमसीडीच्या अधिकार्‍यांकडून माहिती मिळाल्यावर तपास कर्मचारी तिथे पोहोचले तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले.

दिल्लीच्या GK-I पोलिस स्टेशन अंतर्गत GK-I मध्ये असलेल्या IBHAS सोसायटीच्या बी-ब्लॉकमधील फ्लॅटची माहिती MCD ला मिळाली होती. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने लोक चिंतेत होते. एमसीडीच्या अधिकार्‍यांनी महिलेशी बोलून तिला कुत्र्यांना उपचारासाठी त्यांच्याकडे सोपवण्यास सांगितले, तेव्हा तीने ते मान्य केले नाही.

महिलेच्या नकारानंतर एमसीडीने कायदेशीर मार्ग पत्करून सर्च वॉरंट जारी करून महिलेच्या घराची झडती घेतली. आतील दृश्य पाहून एमसीडीचे अधिकारीही थक्क झाले. फ्लॅटमधून उग्र वास येत होता. सर्वत्र कुत्र्यांची अस्वच्छता पसरली होती. पायऱ्यांवर कुत्र्याची घाणही पडून होती.

फ्लॅटमधून इतका तीव्र दुर्गंधी येत असल्याचे सांगण्यात आले की तिथे उभे राहणेही कठीण झाले आहे. कुत्र्यांना योग्य आहार न मिळाल्याने त्यांची प्रकृती ठीक नव्हती. एमसीडीने कुत्र्यांची सुटका केली असून महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीके-1 पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध आयपीसी कलम 269 आणि 291 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या फ्लॅटमध्ये वीजपुरवठा नव्हता. अशा स्थितीत ही महिला 16 कुत्र्यांसह तीन वर्षे कशी जगली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिल्ली एमसीडीला याची माहिती मिळाल्यावर महिलेकडून सहकार्य मागितले असता महिलेने नकार दिला. यानंतर एमसीडी कर्मचाऱ्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत महिलाच्या घराची झडती घेण्यात आली.