काय सांगता! इंदापूरमधील शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड; लाईट शिवाय चालते मोटार चालते, पाहायला लोकांची गर्दी

शेतकरी आपल्या शेतात शेतीची कामं हलकी करण्यासाठी आपल्या पद्धतीने जुगाड करतात. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीमधून ते दिसून येते. यातून शेतकऱ्यांचे कधी पैसे वाचतात तर कधी कष्ट. यातून शेतकऱ्यांना फायदा होत असतो.

शेतकऱ्यांची काम सोपी व्हावीत किंवा कमी वेळेत व्हावीत यासाठी शेतकरी अधिक धडपड करीत असतो. आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एका शेतकऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांचा जुगाड पाहायला लोकांची गर्दी होत आहे.

यामध्ये एक तरुण इंजिन हाताने सुरु करीत आहे. लाईट शिवाय त्यांनी जुगाड करुन मोटार सुरु होत असल्याचे व्हिडीओत दाखवले आहे. यामध्ये एक मोटार, एक बॅटरी असे साहित्य सुरुवातीला दिसत आहे. यामुळे हे जुगाड अनेकांना आवडले आहे.

एकदा मोटार सुरु झाल्यानंतर मोटारमधून पाणी सुरु झाले आहे. त्यावेळी तिथं असलेल्या बोर्डमध्ये पटकन लाईट लागल्या आहेत. नंतर जे पाणी मोटारमधून बाहेर आले आहे. ते पाणी थेट एका मशिनवरती पाडले आहे.

त्यामुळे पुढशी मशीन गतीने गोल फिरत आहे. खाली पडलेले सगळं बाजूच्या शेतात जात आहे. स्पीडचे पाणी लाईट तयार करीत आहे. यामुळे हे जुगाड अनेकांना आवडलं असून यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी अशा गोष्टी तयार केल्या आहेत की, लोक त्यांच्याकडं त्या गोष्टी पाहायला जातात. खरतर लोकांना शेतकऱ्यांनी केलेला जुगाड अधिक आवडतो. याला देखील बघण्यासाठी अनेकजण गर्दी करत आहेत.