मित्रासोबत दर्शनासाठी जाणाऱ्या सावदा येथील दोन सख्या चुलत भावांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. ट्रकने दिलेल्या धडकेत या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे या कुटूंबाचा आधार हरपला आहे.
ही घटना वरणगाव गावानजीक बोहर्डी फाट्यावर घडली आहे. भास्कर पांडुरंग कुंभार आणि लखन पंकज कुंभार असे, या अपघातात मृत पावलेल्या दोन्ही भावांची नावे आहेत. भास्कर पांडुरंग कुंभार आणि लखन पंकज कुंभार यांच्यासह दोन मित्र शिरसाळा येथे मारुती येथे दर्शनासाठी दुचाकीने जात होते.
यावेळी ट्रकने बोहर्डी गावाजवळ बाबा ढाब्यासमोर दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील भास्कर पांडुरंग कुंभार आणि लखन पंकज कुंभार हे गंभीर जखमी झाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या घटनेमुळे सावदा परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत भूषण किशोर पूर्वी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते आणि कुटुंबाचे आधार होते. त्यांच्या या अचानक झालेल्या अपघाती निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, हे तरुण काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. यामुळे आता कुटूंबाला यातून सावरण्यासाठी अवघड परिस्थिती झाली आहे. याबाबत मदतीची मागणी केली जात आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.