काही दिवसांपूर्वी खुलताबाद येथील गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे घरात गोळीबार झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यामुळे याची चर्चा सुरू झाली होती. या गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत आरोपी मृत मुलाचे वडील राहुल राठोड याच्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. आर्यन राहुल राठोड असे मृत मुलाचे नाव आहे. तो अडीच वर्षांचा होता.
याबाबत माहिती अशी की, राहुल कल्याण राठोड, त्याची पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा आर्यनसह भाडेकरू म्हणून राहत होते. राहुल शहरातील कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत काम करतो. त्यांच्या घरात झालेल्या गोळीबारात आर्यन गंभीर जखमी झाला होता. या घटनेत आर्यनच्या डोक्याला गोळी लागली होती.
उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर घाटीतील अतिदक्षता विभागात आर्यनची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र त्याने निधन झाले.
दरम्यान, सकाळी आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी दिली. यानंतर आर्यनची आई संगीता यांनी आक्रोश केला. आरोपी राहुलवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक आवटी करत आहेत.
आर्यनचा बाप राहुल पोलिस कोठडीत असल्याने आर्यनजवळ आई व इतर कुटुंबीय होते. दरम्यान, हा प्रकार कशामुळे झाला याबाबत अजून सविस्तर माहिती समोर आली नाही. याबाबत पोलीस तपास करत आहेत.