नाशिक शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे त्यांच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेमंत हे नाशिकमधील फार मोठे प्रसिद्ध व्यवसायिक आहेत.
त्यांचे अपहरण फक्त पैशांच्या हेतून करण्यात आले आहे का? की यामागे वेगळं काही कारण आहे. याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करतात. दरम्यान, एवढ्या मोठ्या व्यवसायिकाचे त्याच्याच राहत्या घरातून अपहरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस सीसीटीमधील दृश्यांची मदत घेत आहेत. हेमंत पारख हे नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहतात. रात्री आपल्या घरी असताना अचानक त्यांच्या घरासमोर दुचाकी आणि चारचाकी आल्या. त्यांना काही कळायच्या आत त्यांचे अपहरण करण्यात आले.
सीसीटीव्हीत सगळी घटना दिसत आहे. सदर घटना रात्री 10 च्या दरम्यान घडली आहे. यामुळे पोलीस कामाला लागले असून अधिकचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा सवाल आता केला जातोय.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. पारख यांचा रात्रभर पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र हेमंत पारख यांचे अपहरण का केले? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.