सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन चालू आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. यामुळे आता मोठा निर्णय घेण्याची गरज आहे.
सरकारने याबाबत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. असे असताना धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेत आत्महत्या केली. यामुळे खळबळ उडाली आहे. किसन चंद्रकांत माने, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
किसन माने हा उमरगा तालुक्यातील माडज येथील रहिवाशी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचं आहे, असे म्हणत किसनने तलावात उडी घेतली. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले होते.
घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष गेले. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला.
आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेत. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मंगेश सांबळे या सरपंचाने स्वत:ची कारच पेटवली होती. अशा अनेक घटना यामुळे घडल्या होत्या. यामुळे सरकारने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.