एकमेकांवर जीवापाड प्रेम, लग्नाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगुल हॉटेलमध्ये राहीलं अन् घेतला टोकाचा निर्णय…

लग्नाला घरच्यांनी विरोध केल्याने एका प्रेमीयुगुलाने हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. पंचवटी हॉटेल येथून हॉटेलची रूम उघडत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नंतर पोलिस पंचवटी हॉटेलमध्ये पोहोचले. कर्मचाऱ्यांनी सकाळी रूम सफाई करण्यासाठी दिपाली आणि ऋषीकेश हे थांबलेल्या रूमची बेल वाजवली. मात्र रूम उघडली नाही. हॉटेलच्या रिसेप्शनवरून ऋषीकेश आणि दिपालीच्या मोबाईलवर कॉल केला गेला मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

नंतर हॉटेलचा दरवाजा उघडला असता रूममध्ये ऋषीकेश आणि दिपाली या दोघांनीही पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. यामुळे मोठी खळबळ उडाली.

दोघेही जवळच राहत होते. त्यांची ओळख झाली होती. यानंतर दोघे प्रेमात पडले. या दोघांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला. या विरोधानंतर मंगळवारी ते बीडकीनहून शहरात आले आणि रात्री पंचवटी हॉटेल मध्ये थांबले होते.

असे असताना सकाळी तिथेच त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणाची नोंद वेदांतनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक कैलास जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मृत युवकाचे नाव ऋषीकेश सुरेश राऊत (वय २४, रा. बीडकीन), युवतीचे नाव दिपाली अशोक मरकड (वय २०, रा. ढाकेफळ, ता. पैठण) असे आहेत. ऋषीकश हा उच्च शिक्षित असून तो ग्राफिक्स व डिजिटल बॅनर तयार करण्याचा व्यवसाय करत होता. दिपाली बीए प्रथम वर्षात शिकत होती.