बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रोहित प्रचंड संतापला, ‘या’ खेळाडूला धरले पराभवासाठी जबाबदार

भारत आशिया चषक सुपर-4 चा शेवटचा सामना बांगलादेशसोबत खेळला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 265 धावा केल्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 259 धावांपर्यंतच मर्यादित राहिली आणि बांगलादेशने हा रोमांचक सामना 5 धावांनी जिंकला. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता.

बांगलादेशच्या फिरकीपटूंविरुद्ध भारतीय संघाला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात शुभमन गिलने 121 धावांची खेळी केली. मात्र तो आपल्या खेळीने संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

मात्र, अखेर अक्षर पटेलने सामना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तो दुर्दैवाने बाद झाला. त्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला होता. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा सामन्याच्या सादरीकरणादरम्यान बोलताना म्हणाला,

“मोठे चित्र लक्षात घेऊन, आम्ही काही नवीन खेळाडूंना संधी देऊ इच्छितो जे विश्वचषक खेळू शकतात. मात्र, आम्हाला पाहिजे तसा सामना झाला नाही. अक्षरने शानदार फलंदाजी केली, तरी तो आमच्यासाठी सामना पूर्ण करू शकला नाही.

बांगलादेशी गोलंदाजांनाही चांगल्या गोलंदाजीचे श्रेय मिळते. गिलनेही चांगली फलंदाजी करत शतक झळकावले. त्याला त्याच्या खेळावर विश्वास आहे आणि तो कसा खेळायचा हे त्याला माहीत आहे. तो खूप मेहनत करतो.”

बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मा टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. 2 चेंडूंचा सामना करताना रोहित गोल्डन डकचा बळी ठरला. आशिया चषक 2023 च्या सुपर-4 फेरीत बांगलादेशविरुद्ध खाते न उघडता हिटमनला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

नवोदित तनझिम हसन साकिबने रोहित शर्माची विकेट घेतली. रोहित त्याच्या खेळीतून धडा घेईल आणि बांगलादेशविरुद्ध अंतिम फेरीत मोठी खेळी खेळेल, अशी अपेक्षा आहे.