अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सत्तेत सहभागी झाले आहे. तसेच त्यांच्यासोबत काही आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले.
अशातच अजित पवार यांना सरकारमध्ये अर्थमंत्री बनवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी अजून वाढली आहे. कारण महाविकास आघाडीत असताना अजित पवार हे निधी देत नसल्याचे आरोप वारंवार शिंदे गटाकडून केले जात होते.
तसेच राष्ट्रवादीमुळे शिंदे गटातील काही आमदारांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. त्यामुळे दोन आमदारांनी तर थेट पत्रकार परिषदच घेतली आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. संजय शिरसाट आणि भरत गोगावले असे या दोन आमदारांची नावं आहे.
एक ते दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अजित पवार हे अर्थमंत्री होईल या माध्यमांच्या चर्चा आहे. तसेच आम्हाला या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद दिले जाणार आहे, असे त्या आमदारांनी म्हटले आहे.
आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण मी सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.मला जर मंत्रिपदाची संधी दिली गेली तर रायगडचे पालकमंत्रिपद हे माझ्याकडेच राहील आणि ते शिवसेनेकडेच असायला हवे, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा होणार आहे. त्यामध्ये आम्हाला मंत्रिपदाची संधी दिली जाईल. कारण आम्ही दोघेही मंत्रिपदाच्या लाईनमध्ये आहोत. पण १७ जुलैपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, तर आम्ही आमची भूमिका जाहीर करु, असे दोन्ही आमदारांनी म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात त्यांना बाजू मांडण्यासाठी सात दिवस दिले आहे. त्यावरही आमदारांनी भाष्य केलं आहे. आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ मागणार आहोत. त्याला आम्ही योग्य उत्तर देऊ, असे त्या आमदारांनी म्हटले आहे.