प्रियकरासाठी लाखोंचं कर्ज काढलं, कार घेतली, त्याने हफ्तेच भरले नाहीत अखेर तिने संपवलं जीवन

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीला आपल्या प्रियकरामुळे जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

हडपसर परिसरातील मांजरीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राणी रवींद्र दिवटे (वय.२५) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेयसीचे नाव आहे. तसेच आदर्श अजयकुमार मेनन (वय. २५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रियकर आदर्शच्या सांगण्यावरून राणीने तीन लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते प्रियकर फेडणार होता. असे असताना आश्वासन देऊनही प्रियकराने कर्ज न फेडल्याने तिने आत्महत्या केली.

दरम्यान, राणी आणि आरोपी आदर्श या दोघांचे प्रेमसंबंध होते. यामुळे प्रियसीने त्याच्यावर विश्वास ठेवला. आरोपी प्रियकराच्या सांगण्यावरून तिने वेळोवेळी क्रेडिट कार्डवरुन पर्सनल लोन आणि इतर पाच ते सहा लोन ॲपवरून तीन लाख 75 हजार रुपये कर्ज घेतले होते.

ते पैसे प्रियकर फेडणार होता. ते पैसे प्रेयसीने आदर्शला खर्च करण्यासाठी दिले होते. या कर्जाचे हप्ते आरोपी आदर्श फेडणार होता. मात्र त्याने ते वेळोवेळी कर्जाचे हफ्ते फेडलेच नाही.

यामुळे त्यांच्यात भांडत होत होते. यामुळे मानसिक त्रासाला वैतागून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.