अजित पवारांपाठोपाठ आता काँग्रेसनेही दिला शरद पवारांना दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यामुळे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे.

अजित पवार हे आधी विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी राजीनामा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते बनवलं आहे. पण काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने काँग्रेसने यावर दावा केला आहे.

रा्ज्याच्या सभागृहांमध्ये आता काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काँग्रेसचे आमदार जास्त असल्याने काँग्रेस नेत्यांनी ही भूमिका घेतली आहे.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्त करु शकते, असे म्हटले जात आहे. सध्यातरी याबाबत काँग्रेसने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण वडेट्टीवारांनाच हे पद देणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेनेत फुट पडली होती. त्यावेळी शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या पाहता त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. पण त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडली आहे. त्यामुळे काँग्रेसला हे पद देण्यात येणार आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते होते. त्यांना आपली जबाबदारी माहिती होती. पण तेच आता सत्तेत गेले आहे. त्यांच्या जाण्यानंतर विरोधी पक्षनेता कोण होणार याचीच चर्चा होती. काँग्रेसनेही यावर दावा केला होता. तसेच शरद पवारांनीही यावर प्रतिक्रिया देत आमचे आमदार कमी असतील तर त्यांचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा योग्य असेल, असे म्हटले होते.