खरचं पुरुषांच्या अंडरवेअरवरून कळते आर्थिक मंदी कधी येणार? वाचा प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाची थेअरी

कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत वाटचाल करत आहेत. असे असताना आता एक वेगळी माहिती समोर आली आहे. अर्थशास्त्रज्ञ पुरुषांच्या अंडरवेअरच्या विक्रीच्या ट्रेंडद्वारे देशातील अर्थव्यवस्थेतील मंदीचा अंदाज लावू शकतात. अशी माहिती समोर आली आहे.

असे असताना याचा विचार करून सर्वसामान्यांचा गोंधळ उडू शकतो. याबाबत माहिती अशी की, देशात अंडरवियरच्या विक्रीत घट झाली आहे. तुम्ही म्हणाल अर्थव्यवस्थेचा आणि अंडरवेअरचा काय संबंध. अंडरवेअर उत्पादक कंपन्यांची यादी वाढली तर त्यांची विक्री कमी झाली आहे.

जेव्हा महागाईमुळे लोकांचे बजेट बिघडते तेव्हा ते आधी अंतर्वस्त्रासारख्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी पुढे ढकलतात, असे सांगितले जाते. यामुळे सध्या अंतर्वस्त्रांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे.

देशात सगळीकडेच अंतर्वस्त्रांची विक्री कमी झाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडते आणि त्यामुळे ग्राहकांच्या भावनेवर परिणाम होतो. यामुळे यातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.

पुरुषांचे अंडरवेअरच्या विक्रीत घट अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही. लोकांना महागाईचा फटका बसत असल्याची ही लक्षणे आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. २००७ ते २००९ दरम्यान अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीपूर्वी अंडरवेअरच्या विक्रीत घट झाली होती.

यामुळे येणाऱ्या काळात भारतात देखील मोठी आर्थिक मंदी येईल का.? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अंदाज खरा ठरणार की खोटा हे लवकरच समजेल.