पवार फॅमिली पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत, ‘या’ सदस्याने आणले जुळवून; वाचा नेमकं काय घडलं..

राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पडले आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली होती. पण त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटलेले नाही. अशात पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी होत असल्याची चर्चा समोर येत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना न भेटता ते त्यांचे बंधू श्रीनिवास यांच्याकडे गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. तर श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र हा शरद पवार यांच्या भेटीसाठी आला होता. त्यामुळे या भेटीगाठींची सर्वत्र चांगलीच चर्चा होत आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी राजकीय हालचालींना वेग आहे. नुकतीच वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली होती. यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावर या तिघांमध्ये चर्चा झाल्याची समजते. त्यानंतर अजित पवार तिथून निघून गेले होते.

अशात राष्ट्रवादीचे काही नेते हे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आले होते. पण अजित पवार तिथे नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना समजले. पण त्यांचे बंधू श्रीनिवास हे परदेशातून इथे आले आहे. त्यांना भेटण्यासाठी अजित पवार त्यांच्या घरी गेल्याचे समोर आले आहे.

शरद पवार यांच्यावर वारंवार टीका केली जात होती. त्यामुळे सुप्रिया सुळे खुप व्यथित झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास यांना फोन करुन बोलावून घेतले आहे. ते सध्या मुंबईत आहे.

मुंबईत आल्यानंतर अजित पवार आता त्यांच्या भेटीसाठी गेले आहे. तर श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र हा शरद पवार यांच्या भेटीला गेला आहे. त्यामुळे पवार कुटुंबांच्या या कौटुंबिक भेटीगाठी राजकारणातही चर्चेचा विषय ठरले आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या गटातही नाराजी असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळात अजित पवारांच्या आमदारांना चांगले मंत्रिपद दिले जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ते आमदार नाराज असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही अजित पवारांकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.