ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. यासह टीम इंडिया आता जागतिक क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 टीम बनली आहे.
सध्या टीम इंडियाच्या शानदार कामगिरीचे कारण म्हणजे युवा आणि अनुभवी खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी, ज्यांचा दबदबा आयसीसी क्रमवारीतही पाहायला मिळतो. टीम इंडिया जेव्हा पाकिस्तानला मागे टाकून नंबर 1 वनडे टीम बनली तेव्हा त्यात मोहम्मद सिराज आणि शुबमन गिलची महत्त्वाची भूमिका मानली जाऊ शकते.
यावेळी भारताचा अजून एक वनडे सामना शिल्लक आहे. पण हा वनडे सामान जरी भारताने गमावला तरी त्यामध्ये कोणताही फरक पडला नाही. तिसऱ्या वनडे सामना जर भारताने गमावला तरीही ते या मालिकेत २-१ असा विजय साकारू शकतात.
भारताने जरी अखेरचा वनडे सामना गमावला तरी ते वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर राहणार आहेत. भारताने जर दुसरा सामना गमावला असता तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांना अव्वल स्थानावर जाण्याची संधी होती.
सिराज जहाँ सध्या वनडे क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज आहे. तर गिल फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. याशिवाय विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माही 8व्या आणि 10व्या स्थानावर आहेत.
तर कसोटीमध्ये टीम इंडियाने दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली असली तरी ती जिंकण्यात त्यांना यश आले नाही. असे असूनही तो सध्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर भारतीय फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा दबदबा दिसून येतो.
अश्विन नंबर-1 गोलंदाज आहे, तर जडेजा नंबर-3 आहे. याशिवाय कसोटी अष्टपैलू रँकिंगमध्ये जडेजा नंबर-1 तर अश्विन नंबर 2 वर आहे. टीम इंडिया टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर सूर्यकुमार यादव खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
तर भारतीय संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या नंबर 2 वर विराजमान आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 राहण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित 2 पैकी 1 सामना जिंकणे आवश्यक आहे.