आईपुढेच मुलीवर सामूहिक बलात्कार, मुंबईतील संतापजनक घटना; आईच्या गळ्याला लावला चाकू अन्…

मुंबईच्या मुलुंड भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याठिकाणी आईसमोरच तिच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित तरुणी अवघ्या 15 वर्षांची आहे.

याबाबत तपास सुरू आहे. आरोपींनी आईला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक परराज्यात रवाना झाले आहे. या प्रकरणी पोलिस वेगवेगळ्या अंगाने तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेप्रकरणी एका 21 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी सामूहिक बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे घटनांमध्ये वाढ होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या मुंबईच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका 14 वर्षीय गतीमंद मुलीवर धावत्या टॅक्सीत बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती.

यंदाच्या पहिल्या 8 महिन्यांत मुंबईत महिलांच्या विनयभंग व अश्लील वर्तनाच्या 1254 घटना नोंदवण्यात आल्या.यामुळे याठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.