ट्रक चालकाने जीवाची बाजी लावत वाचवली तरुणीची इज्जत, मुलीची परतफेड ऐकून व्हाल भावूक..

हरदयालपूर गावात एक धक्कादायक घटना घडली होती. या गावाच्या सभोवताल अतिशय दाट जंगल आहे, आणि येथे राहत असलेल्या सावित्री देवीची झोपडी खेड्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे.

सावित्री आपल्या १७ वर्षाची मुलगी किरणसमवेत झोपडीत राहते. मात्र तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी ह्या दोघी त्यांच्या झोपडीत झोपल्या असताना काही गुंडांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. तसेच त्यांच्यावर जबरदस्ती केली.

ही घटना रात्रीच्या १ वाजता घडली. त्या गुंडानी सावित्रीची मुलगी किरणला उचलून जंगलात नेले. ती खूप घाबरली होती. जेव्हा गुंड किरणला जंगलाकडे घेऊन जात होते तेव्हा तेथून एक ट्रक जात होता. ट्रक चालक किरणचा आवाज ऐकताच त्याने ट्रक थांबविला, तो एका मित्रासह जंगलाकडे आला.

त्याने पाहिले की गुंड मुलीवर जबरदस्ती करत होते. हे पाहून असलमने त्याच्या दोन्ही हातांनी एका गुंडाला पकडले. तेव्हा दुसरा गुंड आला आणि त्याने मागून असलमच्या डोक्यावर जोरदार घाव केला. डोक्याला जखम झाली असताना देखील त्याने माघार घेतली नाही. शेवटी गुंडांना तेथून पळ काढावा लागला.

हिंमत दाखवून असलमने किरणची आब्रू वाचवली होती. दरम्यान, आता या घटनेला ४ वर्षे झाली. असे असताना एक दिवस असलम त्याच मार्गाने कुठेतरी जात होता, तेव्हा अचानक त्याच्या ट्रकमध्ये काही कारणास्तव आग लागली. ट्रक दरीत पडला. तो ट्रकसह दरीत अडकला होता. ती दरी सावित्रीच्या घराजवळच होती.

त्यांनी कसा तरी असलमचा जीव वाचवला आणि त्याला आपल्या घरी आणले. जेव्हा असलमला जाग आली तेव्हा त्याने किरणला ओळखले. यावेळी असलमच्या डोळ्यातून आश्रू थांबत नव्हते. त्या दिवसापासून किरणने असलमला आपला भाऊ मानले. आता ती प्रत्येक रक्षाबंधनाला त्याला राखी बांधते.