“१५-२० दिवसांत चमत्कार घडणार, शरद पवार मोदींसोबत अन् अजितदादा मुख्यमंत्री होणार”

आमदार रवी राणा यांनी एक भाकीत वर्तवले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी मी दर्शन घेतलेल्या प्रत्येक गणपतीला साकडे घातले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच येत्या १५-२० दिवसांमध्ये राज्यात चमत्कार घडेल. राज्यात आणि केंद्रात शरद पवार यांचा सहभाग असलेले मजबूत मोदी सरकार दिसेल, असे विधान त्यांनी केले आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक आहेत.

यामुळे रवी राणा यांच्या या भाकिताने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ते म्हणाले, मी अनेक ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो. ज्याठिकाणी गेलो तिकडे गणपतीला एकच सांगितले की, देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली पाहिजे.

हा चमत्कार १५-२० दिवसांत दिसेल. लवकरच राज्यात आणि केंद्रात शरद पवारांच्या पाठिंब्याचे मजबूत मोदी सरकार दिसेल, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत ते म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. ते आता उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते, ते उपमुख्यमंत्री झाले. तसेच ठाकरे सरकारमध्ये नगरविकासमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, यामुळे कधीही काहीही होऊ शकते.

यामुळे येत्या १५ दिवसांत शरद पवार मोदी सरकारसोबत आले तर अजित पवार मुख्यमंत्री होणे, हे देखील शक्य आहे. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चा सुरू झाली आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.