वचाती हल्ला आणि बलात्कार प्रकरण हे एक चर्चेत असणारे प्रकरण आहे. वचाती हे तामिळनाडूतील सिथेरी टेकडीवर धर्मापुरी जिल्ह्यात वसलेले गाव आहे. हा खटला एक अनेक मोठ्या खटल्यांपैकी एक आहे. 30 वर्ष तो खटला चालला.
याबाबत वचाती या गावातल्या 18 स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला आणि खेड्यातील इतर नागरिकांना अधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. गावातील लोक चंदनाच्या तस्करीत सामील आहेत, या संशयावरून पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी या गावात धाड टाकली होती.
दरम्यान, 1992 मध्ये सलग दोन दिवस 18 बायकांवर बलात्कार करण्यात आला, गावातील 100 आदिवासी लोकांना जे बहुतांश दलित समाजातील आहे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच लूट करण्यात आली.
आता उच्च न्यायालयाने या प्रकरणात धर्मपुरी जिल्हा न्यायालयाने 215 जणांची शिक्षा कायम ठेवली आहे. यामध्ये पीडितांना 10 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांकडून 5 लाख रुपये वसूल केले जावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, 2011 मध्ये आरोपी ठरवलेल्या अधिकाऱ्यांनी या शिक्षेच्या विरोधात अपील केले होते. या खटल्याच्या काळात 54 आरोपींचा मृत्यू झाला. दरम्यान, वीरप्पनच्या टोळीचा भाग होऊ नये म्हणून आम्ही गावकऱ्यांना रोखलं.
आम्ही आमचे कर्तव्य पार पाडल्यामुळे आमच्यावर हे आरोप करण्यात आले. वचाती प्रकरणात दोषी ठरलेल्या 215 अधिकाऱ्यांपैकी काहींनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. घटना घडली तेव्हा कर्तव्यावर नसलेल्या अनेक अधिकाऱ्यांवरही सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, पोलीस, वनाधिकारी आणि काही महसूल अधिकारी गावात आले. त्यांनी सगळीकडे तोडफोड केली आणि 18 तरुण बायकांवर बलात्कार केला, असे एका पीडित महिलेने सांगितले. काही लहान मुलींना देखील त्रास देण्यात आला. यामुळे त्यांचे आयुष्य उध्वस्त झाले.