---Advertisement---

साताऱ्यात खून करून रस्त्यातच जाळला तरुणाचा मृतदेह, श्वान पथक बोलवलं अन् सर्वांना धक्काच बसला…

---Advertisement---

साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कराड येथील वनवासमाची गावामध्ये युवकाचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. येथील सहापदरी कामाच्या सिमेंट नाल्यात हा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत पोलिसांची तपास पथके रवाना केली आहेत. मृतदेह जळून खाक झाल्याने ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. काही तांत्रिक बाबींवर तपासाला गती देऊन मारेकऱ्यांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, १० तासांपूर्वी खून करून मृतदेह गोणपाटात गुंडाळून जाळण्यात आला. येथील वनवासमाची हद्दीत स्वराज इन्स्टिट्यूट, कॉलेजसमोर महामार्गाच्या मधोमध तयार केलेल्या सिमेंटच्या नाल्यातून धूर येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले.

यामुळे गावच्या पोलीस पाटलांना याची कल्पना देण्यात आली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याठिकाणी पाहणी केली. यामध्ये युवकाचा मृतदेह बांधून जाळलेल्या अवस्थेत पुरावा नष्ट करण्याच्या तयारीने टाकण्यात आल्याचे दिसून आले.

याठिकाणी एक चप्पल चांगली, तर एक आर्धी जळालेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच दारूची बाटली, घड्याळ व अन्य महत्त्वाच्या काही वस्तू दिसून आल्या. येथील श्वान पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी श्वान जवळच असलेल्या स्वराज इन्स्टिट्यूट कॉलेजच्या पाठीमागे जाऊन घुटमळले. याबाबत अजून कोणाला ताब्यात घेण्यात आले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---