श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर…; अखेर बोनी कपूर यांनी सोडले मौन; सत्य काय ते सांगीतलेच…

24 फेब्रुवारी 2018 रोजी बॉलिवूडची ‘चांदनी’ अर्थात श्रीदेवीने दुबईत जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला. त्यावेळी तिच्या चाहत्यांना यावर विश्वास ठेवणे खूप कठीण होते.

सर्वांना जाणून घ्यायचे होते की, श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला? श्रीदेवीच्या निधनानंतर पाच वर्षांनी तिचे पती बोनी कपूर यांनी मौन तोडले आहे. तिचा मृत्यू नैसर्गिक नसून अपघाती झाल्याचा खुलासा त्यांनी केला.

बोनीने एका मुलाखतीत सांगितले की, ती अनेकदा मीठाशिवाय आहार घेत असे. यामुळे तिला अनेकदा चक्कर येत असल्याचे त्यांनी उघड केले. ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीने तिच्या पाच दशकांच्या कारकिर्दीत 300 चित्रपट पूर्ण केले, ज्यामध्ये तिचा 300 वा चित्रपट मॉम हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

दरम्यान, मुलाखतीत बोनी कपूर पहिल्यांदाच श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल उघडपणे बोलले. ते म्हणाले, श्रीदेवी मृत्यूच्या वेळीही डाएटवर होती. ती अनेकदा उपाशी राहायची. तिला छान दिसायचं होतं. पडद्यावर छान दिसण्यासाठी ती खूप प्रयत्न करायची. त्यासाठी ती डाएटवर असायची. माझ्याशी लग्न केल्यानंतर, तिला कधीकधी ब्लॅकआउटचा त्रास होत होता आणि डॉक्टर तिला सांगत असत की तिला कमी रक्तदाबाचा त्रास आहे.

चित्रपट निर्माते बोनी कपूर म्हणाले, ‘हा नैसर्गिक मृत्यू नव्हता. तो अपघाती मृत्यू होता. मी याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला कारण माझी चौकशी केली जात होती. त्यावेळी सुमारे 24 किंवा 48 तास माझी चौकशी झाली होती. पण मी याबाबत काहीही बोललो नाही.

अधिका-यांनी सांगितले की त्यांना असे करावे लागले कारण ते भारतीय माध्यमांच्या तीव्र दबावाखाली होते आणि त्यांना वाटले की कोणतीही चूक झाली नाही. मी लाय डिटेक्टर चाचणीसह इतर सर्व चाचण्या केल्या आणि त्यानंतर जो अहवाल आला तो स्पष्टपणे अपघाती मृत्यूचा होता.

बोनी कपूर म्हणाले की, पडद्यावर चांगले दिसण्यासाठी श्रीदेवी क्रॅश डायटिंग करत असे. माझे लग्न झाल्यावर ती अनेक वेळा बेशुद्ध पडली होती. तिने आहारात मीठ घेतले नाही, त्यामुळे रक्तदाब कमी राहिला. डॉक्टरांनी तिला अनेकदा मीठ खाण्याचा सल्ला दिला, पण तिने कोणाचेच ऐकले नाही.

दक्षिणेतील अभिनेता नागार्जुनने बोनी कपूरला श्रीदेवीसोबत सेटवर घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितले होते. या घटनेचे वर्णन करताना बोनी कपूर म्हणाले की, “शूट दरम्यान श्रीदेवी बाथरूममध्ये बेशुद्ध पडली. हे खूप दुर्दैवी होते. जेव्हा नागार्जुन तिच्या मृत्यूनंतर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की, एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंगदरम्यान ती क्रॅश डाइटवर होती. शूटिंगदरम्यान ती बाथरूममध्ये पडली आणि तिचा दात तुटला.”

बोनी कपूरने सांगितले की, लग्नानंतर तिला तिच्या कठोर आहाराच्या सवयीबद्दल माहिती मिळाली. अनेकवेळा ती मीठ-साखर नसलेले अन्न घेत असे. बोनी कपूर पुढे म्हणाले, “तिने हे गांभीर्याने घेतले नाही, आणि घटना घडेपर्यंत तिला त्याचे गांभीर्य कळले नसावे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला होता.

या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला. उल्लेखनीय आहे की श्रीदेवीचा जन्म 1963 मध्ये तामिळनाडूच्या केमिनमपट्टी गावात झाला होता, पण जेव्हा ती सुमारे 4 वर्षांची होती तेव्हा ती चेन्नई (तेव्हा मद्रास) येथे राहायला गेली.

वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षी तिने तमिळ चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केले. बाल कलाकार म्हणून सुरुवात केल्यानंतर यशस्वी झालेल्या काही कलाकारांपैकी ती एक होती. श्रीदेवीने हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी 5 फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले.

श्रीदेवीने अनेकदा आपल्या मुलींना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला, कारण जास्त मिठामुळे चेहरा फुगलेला दिसतो. ती म्हणायची की जास्त मीठ खाल्ले तर तू कॅमेऱ्यात जरा जाड दिसशील. बोनी कपूर म्हणाले की, हे इतके गंभीर असू शकते याची आम्हाला कल्पना नव्हती.