बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल नेहेमी चर्चेत असते. नुकतीत शहनाजने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिने रिव्हिलिंग ड्रेस परिधान केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले. यामुळे तिने सोशल मीडियावर ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
याबाबत माहिती अशी की, शहनाजने टोरेन्टोला फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. तेव्हा शहनाजने रिव्हिलींग ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. त्यावरून शहनाजला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी शहनाज म्हणाली, जर रिया कपूर म्हणाली तर हे पण काढून टाकू. आम्ही स्टायलिंगमध्ये थोडा पण कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्ही इंटरनॅशन्ल डिझायनर्सचे कपडे घालत आहोत. त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते, यासाठी आमची कधी पासून प्रतिक्षा करत होतो.
दरम्यान, शहनाज गिलच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहनाज गिल ही सध्या ‘थॅंक्यू फॉर कमिंग’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामुळे अनेक ठिकाणी हजेरी देखील लावत आहे.
शहनाज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर त्यानिमित्तानं ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसते. यामुळे ती चाहत्यांच्या देखील संपर्कात आहे. त्यांच्या प्रशांची उत्तरे देखील देत आहे.