तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गृहपाठ न केल्याने शिक्षकाने बेदम मारहाण केल्याने (Teacher beat student) येथील एका खासगी शाळेतील केजीच्या विद्यार्थ्याचा सोमवारी मृत्यू झाला. हेमंत असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो ५ वर्षांचा होता.
घरचा अभ्यास न केल्यानं शिक्षकानं हेमंतला मारहाण केली. मारहाणीमुळे हेमंत बेशुद्ध होऊन जागीच कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
हेमंतच्या आई, वडिलांसह कुटुंबातील सर्वच सदस्यांनी शिक्षकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. हेमंतचा मृतदेह किंडरगार्टनसमोर ठेऊन त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
त्याचवेळी हैदराबादमधून विद्यार्थ्याला मारहाण केल्याची (Teacher beat student) आणखी एक घटना समोर आली आहे. येथील शाळेत केजीच्या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. हे प्रकरण रामनाथपूर परिसरातील विवेक नगर येथील आहे. गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला पाटीने मारले. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या डोक्यावर पाटीने वार केले.
आजकाल दक्षिण भारतात शिक्षकांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. पाहिल्यास या घटनांमागचे कारण फारच छोटे असल्याचे दिसून येते, त्या बदल्यात मृत्यूसारख्या घटना घडतात.