‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेतून प्रसिद्धी मिळविणाऱ्या सुशांत सिंग राजपूतच्या(Sushant Singh Rajput) मृत्यूला 3 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूने संपूर्ण टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. सुशांतचे चाहते अजूनही त्याच्या मृत्यूचे सत्य जाणून घेण्याची वाट पाहत आहेत.
अशा परिस्थितीत रियाची नुकतीच एक मुलाखत खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीला सुशांतबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सुशांतच्या(Sushant Singh Rajput) मृत्यूशी तिचा संबंध जोडला जात असताना रिया चक्रवर्तीने तिच्या आयुष्यातील तो क्षण आठवला.
ज्यावेळी अभिनेत्रीला प्रचंड त्रासातून जात होती. सुशांतच्या(Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर सगळेच रियाकडे संशयाने बघत होते. अभिनेत्री कुठेही गेली तरी लोक तिच्याबद्दल कुजबुजत असत. रियाबद्दल लोकांमध्ये एक समज निर्माण झाला होता.
या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘खरं सांगू, मी जेव्हाही अशा खोलीत जायचे जिथे लोक होते, तेव्हा मला त्यांच्या चेहऱ्यावरून सगळं स्पष्ट दिसत होतं. लोक माझ्याकडे असे बघत असे कि मी अजून जिवंत कशी आहे. मात्र, मला काही लोकांचा पाठिंबाही मिळाला.
मी जेव्हाही कोणाशी बोलायचे तेव्हा त्यांच्या मनात काय चालले आहे ते मला समजायचे. कधी कधी ते माझ्याकडे बघायचे आणि म्हणायचे, तू गुन्हेगार दिसत नाही. त्यांचा मनातल्या गोष्टी मला जाणवत होत्या. मी त्याकडे दुर्लक्ष केल.
जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की तिने सुशांतला(Sushant Singh Rajput) कधी ड्रग्स दिले होते का? ज्यावर रियाने नकार दिला. अभिनेत्री म्हणाली, ‘मला या विषयावर बोलून कंटाळा आला आहे. मला याबद्दल अधिक बोलायचे नाही, मला एनसीबीबद्दल बोलायचे नाही.
रिया पुढे म्हणाली की लोकांनी तिच्या मानसिक आरोग्याबद्दल बोल पाहिजे ज्यावेळी तिने त्या काळातील प्रत्येक परिस्थितीचा कसा सामना केला. आम्ही तुम्हाला सांगतो की, 34 वर्षीय सुशांत सिंग राजपूतचा 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृत्यू झाला होता.
अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे त्याच्याविरुद्ध चौकशीही सुरू करण्यात आली होती. एनसीबीनेही या प्रकरणाचा स्वतःचा तपास केला ज्यामुळे अभिनेत्रीला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले. मात्र, आता सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे.