Delhi news : दिल्लीतील मुनिरका येथे रविवारी एक हृदयद्रावक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका खोलीतून तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये 27 वर्षीय महिला आणि चार आणि अडीच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
पोलिसांनी सांगितले की, सकाळी 10.30 वाजता एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचे गेट तोडले तेव्हा आतील दृश्य धक्कादायक होते. खोलीच्या आत एका महिलेचा मृतदेह लटकलेला होता आणि बेडवर दोन मुलांचे मृतदेह पडले होते.
तपासादरम्यान तिघांच्याही मनगटावर कापलेल्या खुणा आढळून आल्या. पोलिस तपासात या महिलेचे 2017 मध्ये जोगेंद्र शर्मासोबत लग्न झाल्याचे समोर आले आहे. जोगेंद्र शर्मा हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये कॉन्स्टेबल आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात महिलेच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. मुलीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता, असा दावा त्यांनी केला. रविवारी दक्षिण दिल्लीत 27 वर्षीय महिला आणि तिची दोन मुले त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आली.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, महिलेचा पती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये कॉन्स्टेबल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 वाजता किशनगड पोलिस स्टेशनला मुनिरका गावात एका महिलेने तिच्या घरात आत्महत्या केल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर घराच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या खोलीचा दरवाजा आतून बंद आढळून आला. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडला. बेडवर एक महिला आणि दोन लहान मुले पडलेली आढळली. वर्षा शर्मा आणि तिची चार ते अडीच वर्षे वयाची दोन मुले अशी या तीन मृतदेहांची ओळख पटली आहे.