शिंदे गट-भाजपच्या मंत्र्यांना धक्का! महत्वाची खाती काढून अजितदादा गटाला दिली; पहा यादी

अजित पवार हे आता सत्तेत आले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. तसेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना कोणतं खातं मिळणार याचीही चर्चा होती.

खातेवाटप लवकरच होणार असल्याची चर्चा होती. असे असतानाच आता खातेवाटपाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांना आता खाती वाटण्यात आली आहे.

खातेवाटप झाले असून भाजपची आणि शिवसेनेची काही खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. अजित पवारांना अर्थ खातं मिळणार अशी चर्चा होत असताना भाजपने त्यांना वित्त व नियोजन खातं दिलं आहे. आधी वित्त व नियोजन खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे होते.

नवनियुक्त मंत्र्यांना खाते देण्यात आले असून काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदलही करण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये काही नेत्यांना धक्काही बसला आहे.

गिरीष महाजन यांचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य खातं हसन मुश्रीफांना, अब्दुल सत्तारांचे कृषीमंत्री खाते धनंजय मुंडेंना, रविंद्र चव्हाण यांच्याकडे असलेले अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळांना, अतुल सावे यांच्याकडचे सहकार दिलीप वळसे पाटलांना, गिरीष महाजनांचे क्रिडा व युवक कल्याण संजय बनसोडे यांना, एकनाथ शिंदे यांचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन अनिल पाटील यांना देण्यात आले आहे.

तसेच मंगलप्रभाल लोढा यांच्याकडे असलेले महिला व बालविकास आदिती तटकरे यांना, संजय राठोडांकडे असलेले अन्न व प्रशासन धर्मराव बाबा आत्राम यांना देण्यात आले आहे. तर दादा भुसे यांचे बंदरे हे खाते संजय बनसोडे यांना देण्यात आले आहे.

या खातेवाटपात शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांनाही मोठा बसला आहे. कारण त्यांच्याकडे असलेली खाते आता राष्ट्रवादीला मिळाली आहे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्याकडेच खाते राज्याची तिजोरी होती. त्यामुळे निधी भेटत नसल्याची तक्रार शिंदे आमदार करत होते. पण आता पुन्हा अजित पवारांना ते खातं मिळालं आहे. त्यामुळे शिंदे आमदारांची नाराजी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.