World Cup 2023 : वर्ल्डकप दरम्यान ‘या’ दिग्गज क्रिकेटरची बहीण देतेय मृत्यूशी झुंज, सगळं काही सोडून खेळाडू ताईकडे धावला

World Cup 2023 : 7 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानचा संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आला. क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, सहाय्यक कर्मचारी आणि माजी दिग्गज खेळाडूही त्यात उपस्थित होते.

परंतु दरम्यान, पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसाठी एक वाईट बातमी आली आहे आणि त्याला वर्ल्ड कप 2023 मध्येच सोडून पाकिस्तानला परत जावे लागले. वास्तविक क्रिकेटरची बहीण पाकिस्तानमध्ये जीवन-मरणाची लढाई लढत आहे. अशा परिस्थितीत त्याला सर्व काही सोडून पाकिस्तानात परत जावे लागले.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने सोमवारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, त्याची बहीण आजारी आहे आणि ती तिच्या जीवन-मरणाची लढाई लढत आहे. शाहिद आफ्रिदीने ट्विटर हँडल (एक्स) वर लिहिले –

“मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल, माझे प्रेम कायम आहे. माझी बहीण सध्या तिच्या आयुष्यासाठी लढत आहे. मी तुम्हाला तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास विनंती करतो. अल्लाह तिला लवकर बरे करो आणि निरोगी आयुष्य देवो.’

शाहिद आफ्रिदीची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून 1 लाख 25 हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. या फोटोमध्ये शाहिद आफ्रिदीने आपल्या बहिणीचा हात धरलेला दिसत आहे.

ज्यामध्ये तिच्या बोटाला पल्स आणि ऑक्सिमीटर जोडलेले आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सही माजी पाकिस्तानी क्रिकेटरच्या बहिणीच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत. शाहीद आफ्रिदीचा जावई शाहीन शाह आफ्रिदी सध्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानकडून खेळत आहे.

शाहिद आफ्रिदीला 11 भावंडे असून त्यात 6 भाऊ आणि पाच बहिणी आहेत. शाहिद आफ्रिदी हा पाचवा भाऊ आहे. त्याचे भाऊ तारिक आफ्रिदी आणि अश्फाक आफ्रिदी देखील क्रिकेटर राहिले आहेत. त्याचबरोबर शाहिद आफ्रिदीही पाच मुलांचा बाप आहे.