Nagpur news : नागपूर हादरलं! दरोडेखोर भरदिवसा ट्रॅव्हल्समध्ये घुसले, चाकू दाखवत ८० प्रवाशांना लुटलं…

Nagpur news : नागपूर येथील रामटेक तालुक्यातील आमडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या सात जणांनी मिळून ८० प्रवाशांची बस लुटली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे.

यामध्ये प्रवाशांकडून एकूण १ लाख ९६ हजार ७५० रुपयांचा ऐवज लुटला आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमडी गावाजवळील एस. आबा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये दोन अनोळखी व्यक्ती चढले आणि पेट्रोल पंपावरून दोन अनोळखी व्यक्ती बसमध्ये चढले.

बसमध्ये ते प्रवाशांकडून तिकिटाच्या पैशांची मागणी करू लागले. नंतर प्रवाशांनी आम्ही तिकीट घेतल्याचे सांगितले आणि प्रवाशांनी पैसे देण्यास विरोध केला. यानंतर त्यांनी प्रवाशांना दमदाटी सुरू केली. तसेच मारहाण केली. चाकूच्या धाकावर झालेल्या या दरोड्यात एकूण १ लाख ९६ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

घटनेनंतर सर्व आरोपी बसमधून खाली उतरले आणि पळून गेले. रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सध्या तपास केला जात आहे.

दरम्यान, अमन ईश्वर इंगळे (२६ वर्षे, रा. रामबाग नागपूर), गुलाब शाबीर शेख (३२ वर्षे, रा. कपिलनगर नागपूर), रशीक शेख रफिक शेख (३४ वर्षे, रा. दिघोरी नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. याबाबत तपास सुरू आहे.