Amravati News: इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचे काम करत असताना अचानक बसला धक्का, वायरमनच्या जाण्याने गाव हळहळलं…

Amravati News: अमरावतीमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. येथील वाठोडा शुक्लेश्वर येथील महावितरण उपकेंद्रांतर्गत वाकी रायपूर (ता. भातकुली) येथील खासगी वायरमनचा ट्रान्सफॉर्मरचे काम करीत असताना मृत्यू झाला आहे.

काम करत असताना ते वीजप्रवाहाच्या संपर्कात आले. यामुळे ही घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, वडुरा शिवारामध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचे काम करीत असताना अचानक विजेचा करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. दीपक दिगंबर पडवाळ असे त्यांचे नाव आहे. याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक वर्षे ते वायरमन म्हणून काम करत होते. दरम्यान, घटनास्थळ खल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने खल्लार पोलिसांना पाचारण करण्यात आले.

१७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती खोलापूर पोलिसांना मिळताच ठाणेदार पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या घटनेमुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला. याबाबत कोणाची चूक असल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. पोलिस याबाबत तपास करत आहेत.