Parabhani News : रुमालाने केला घात, सोयाबीन काढत असतांनाच शेतकऱ्याचा जीव गेला, घडलं भयंकर

Parabhani News : परभणीमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी सोयाबीन काढत असतांनाच शेतकऱ्याचा जीव गेला आहे. एक छोटासा रुमाल या शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. बालासाहेब साठे अस मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथे हार्वेस्टींग मशीन मधून सोयाबीन काढत असतांना विचित्र घटना घडली. गळ्यातला रुमाल हार्वेस्टींग मशीनच्या पंख्यात अडकून शेतकरी बेशुद्ध झाला. गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला आहे. ज्या शेतात घाम गाळला तिथेच या शेतकऱ्याने प्राण सोडले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, बालासाहेब साठे हे शेतात काम करत होते. यावेळी गळ्यातला रुमाल हार्वेस्टींग मशीनच्या पंख्यात अडकून ते बेशुद्ध झाले. त्यांच्या गळ्याला फास लागल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे कुटूंबाचे एकच आक्रोश केला. याबाबत तपास सुरू आहे.