Uber News : उबर चालकाचा तरुणीला मेसेज, मला तुझ्याशी…,’ स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर कंपनी म्हणाली…

Uber News : सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणीने एक पोस्ट शेअर करत वाच्यता केल्याने ही घटना उघड झाली आहे. यामध्ये उबर चालकाने तरुणीला मेसेज करुन, माझ्याशी मैत्री करशील का? अशी विचारणा केली.

नंतर तरुणीच्या पोस्टवर उबर कंपनीनेही उत्तर दिले आहे. या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. यामध्ये तरुणीने चालकाने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

यामध्ये तो म्हणतोय की, मी तुम्हाला ड्रॉप केलं होतं, आठवतंय का? यावर तरुणी तू मला का मेसेज करत आहेस? अशी विचारणा करते. त्यावर यार मला तुझ्याशी मैत्री करायची आहे असे म्हणतो. त्यानंतर तरुणीने थेट एक पोस्ट शेअर केली आहे.

तरुणीने उबरला टॅग करत तक्रार केली आहे. “तुमच्या एका चालकाबाबत आलेला गंभीर अनुभव शेअर करण्यासाठी मी हे लिहित आहे. 19 ऑक्टोबरला तुमच्या एका चालकाने प्रवासानंतर मला अस्वस्थ करणारा संदेश पाठवला, असे म्हटले आहे.

तसेच यामुळे मला फक्त अस्वस्थच वाटत नाही आहे, तर सुरक्षेची गंभीर चिंता सतावत आहे. यावर उबरनेही उत्तर दिले आहे. ही स्थिती किती अस्वस्थ कऱणारी आहे याची आपल्याला कल्पना असल्याच त्यांनी सांगितले असून, आपली टीम तपास करत असल्याची माहिती दिली आहे.

ही परिस्थिती किती अस्वस्थ कऱणारी आहे हे समजू शकतो. आमची टीम तपास करत असून, लवकरच तुम्हाला अपडेट देऊ, असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे याबाबतचा तपास सुरू आहे.