Dawood Malik : पाकिस्तानात दणादण मारले जात आहेत भारताचे शत्रू , कुप्रसिद्ध दहशतवादी दाऊदची गोळ्या घालून हत्या

Dawood Malik : भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेला पाकिस्तानी दहशतवादी दाऊद मलिक याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. मलिक हा लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक आणि भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा जवळचा सहकारी मानला जात होता.

पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमध्ये त्याची हत्या करण्यात आली. पाकिस्तान पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यातील मिराली भागात अज्ञात मुखवटा घातलेल्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात तो ठार झाला.

मलिक याला एका खासगी दवाखान्यात लक्ष्य करण्यात आले. ही हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. गेल्या काही आठवड्यांमध्ये, भारतामध्ये वाँटेड घोषित केलेल्या अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून ठार केले आहे.

11 ऑक्टोबर रोजी, भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आणि 2016 च्या पठाणकोट हल्ल्यातील मुख्य सूत्रधार शाहिद लतीफची सियालकोटमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली होती. दहशतवादी रशीद लतीफ हा भारतात मोस्ट वॉन्टेड होता.

भारत सरकारने त्याचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता. एनआयएने त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 2016 मध्ये जैशच्या दहशतवाद्यांनी पठाणकोटच्या एअरबेसवर हल्ला केला होता. यामध्ये सात जवान शहीद झाले

पाकिस्तानी मीडियानुसार, सियालकोटच्या बाहेरील मशिदीत दहशतवादी शाहिदची हत्या करण्यात आली. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि गोळीबार करून पळून गेले. शाहिद लतीफने पठाणकोटच्या दहशतवाद्यांना शस्त्रे आणि इतर मदत पुरवली होती.

लतीफला 1996 मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकही झाली होती. तो जैशचा दहशतवादी होता. मौलाना मसूद अझहरच्या सांगण्यावरून त्याने पठाणकोटमध्ये हल्ला करण्याची योजना तयार केली होती.

2010 मध्ये त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आणि पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आले. त्यादरम्यान वाघा बॉर्डरवरून आणखी 20 दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या हवाली करण्यात आले होते.