Parag Desai : वाघ बकरी चहाचे संचालक आणि मालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात मॉर्निंक वॉकसाठी जात असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता. मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता.
ते आपला बचाव करत असताना पाय घसरून खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे घोषित केले होते. ते अनेक दिवसांपासून व्हेटिंलेटरवर होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
रात्री त्यांचे निधन झाले आहे. पराग देसाई यांचे वय अवघे 49 वर्ष होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पराग देसाई हे वाघ बकरी चहा कंपनीच्या 6 ग्रुप ऑफ डायरेक्टरपैकी एक होते. कंपनीचे मोठे नाव करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
यामुळे त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वाघ बकरी कंपनीसाठी त्यांनी मार्केटिंग, सेल्स आणि एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये काम केले आहे. ते टी एक्सपर्ट देखील होते. सध्या ते कंपनीक एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर या पदावर कार्यरत होते.
दरम्यान, त्यांनी अमेरिकेतील लाँग आयडँड युनिव्हर्सटीतून एमबीए केले होते. त्यावर त्यांनी कंपनीकडे लक्ष दिले. यानंतर कंपनीत त्याने काम करून आपला ब्रॅण्ड मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला होता.