Wasim Akram : वर्ल्डकपच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचा अनपेक्षितपणे पराभव केला. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला अफगाणिस्तानने 8 विकेट्स राखून पराभूत केले.
यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. पाकिस्तानच्या पराभवासाठी बाबर आझमने गोलंदाजांना दोष दिला असला तरी पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण या स्पर्धेत चांगले राहिले नाही. हे देखील यासाठी मोठे कारण सांगितले जात आहे.
तसेच आधीच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानने अनेक कॅच सोडले. अनेकदा अगदी सहज आडवता येतील असे चौकारही पाकिस्तानी खेळाडूंना अडवता आले नाहीत. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. यामुळे पाकिस्तानच्या एका माजी कर्णधाराने थेट पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे खाणं काढलं आहे.
यामुळे याची चर्चा सध्या चर्चा सुरू झाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार वसीम अक्रमने पाकिस्तानला अफगाणिस्तानने पराभूत केल्यानंतर टीमला चांगलंच सुनावलं आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय बदल दिसणार का हे लवकरच समजेल.
वसीम अक्रम म्हणाला, आजचा दिवस फारच वाईट होता. 280 धावांपर्यंत ते (अफगाणिस्तान) केवळ 2 विकेट्स गमावून पोहचले. ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही यांची (पाकिस्तानची) फिल्डींग पाहा. मागील 3 आठवड्यांपासून असं वाटतं आहे की या खेळाडूंनी मागील 2 वर्षामध्ये एकदाही फिटनेस टेस्टला समोरे गेलेले नाहीत.
मी यांची नावं घेऊन टीका केली तर शर्मेनं त्यांची मान खाली जाईल. हे खेळाडू रोज 8-8 किलो मटण खातात, तरी ते तंदरुस्त नाहीत. असेही त्याने म्हटले आहे. यावेळी तो चांगलाच संतापल्याचे दिसून आले. त्याने संपूर्ण टीमलाच दोष दिला आहे.