Sambhaji Nagar : पुण्यावरून आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. आई आजारी असल्यामुळे तरुण पुण्यावरून आईला भेटण्यासाठी सिल्लोडकडे निघाला होता. असे असताना मात्र रस्त्यातच त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
फरशी फाट्यावर भरधाव कारने तरुणाच्या दुचाकीला धडक दिली आणि या धडकेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत समाधान विठ्ठल राऊत असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
त्याचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो कामासाठी पुण्यात राहत होता. एका हॉटेलमध्ये तो नोकरी करत होता. त्याची आई काही दिवसांपासून आजारी होती. यामुळे तो घरी निघाला होता. मात्र वाटेतच त्याचा अपघात झाला.
दरम्यान संभाजीनगर – जळगाव महामार्गावर सिल्लोडकडे जात असताना फुलंब्री गावाच्या समोर फरशी फाटा येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समाधानच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक रवी देशमुख करत आहेत.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे आजारी असल्यामुळे मुलगा भेटण्यासाठी येत असल्याची वाट पाहणाऱ्या आईल मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ आली. यामुळे उपस्थित लोकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.