Pune news : मोठी बातमी! पुण्यात सराफ व्यवसायिकावर गोळीबार, घटनेने उडाली खळबळ…

Pune news : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढते आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारखे अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. यामुळे भीतीचे वातावरण आहे.

सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यवसायावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

रात्री दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे. पुण्यामधील वानवडी भागातील बीटी कवडी रोड जवळ ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये सराफ व्यवसायिक गंभीर जखमी झाला आहे.

त्याचबरोबर गोळीबार करणाऱ्यांनी व्यवसायिकाकडील सोन लुटून नेल्याची देखील माहिती मिळत आहे. सध्या या गोळीबाराच्या घटनेनंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सध्या पोलीस अधिकचा तपास करत आहेत. दरम्यान हा गोळीबार नेमका कोणी केला? कोणत्या कारणावरून करण्यात आला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाल्यामुळे पुणे शहर हादरले आहे. गोळीबार करून हल्लेखोरांनी कोट्यावधी रुपयांचे सोने लुटले आहे. हल्लेखोरांनी पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याचे देखील बोलले जात आहे.