Hyderabad : भयानक घटना! केमीकलमुळे बिल्डींगला लागली भीषण आग, ७ जण अक्षरशः जिवंत जळाले

Hyderabad : हैदराबादमधून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. येथील एका निवासी इमारतीत साठवलेल्या रसायनाला आग लागली. यानंतर आग संपूर्ण इमारतीत पसरली आणि सात जणांना आपला जीव गमवावा लागला.

मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे. याशिवाय 14 जण जखमी झाले आहेत. पोलिस उपायुक्त (मध्य विभाग) एम व्यंकटेश्वरलू यांनी सांगितले की, ही घटना नापल्लीजवळील बाजारघाट परिसरात सकाळी 9:30 च्या सुमारास घडली.

पोलिसांनी सांगितले की, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, प्रथम स्टोअरच्या परिसरात छोटी आग लागली पण काही वेळातच ती संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरली. रात्री ९.३८ च्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र सात जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफलाही याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांनी मदत आणि बचावासाठी दोन पथके पाठवली आहेत.

काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या इमारतीत २१ जण अडकले असून त्यांना उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगीतून बाहेर काढल्यानंतर एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याचे त्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी रुग्णालयाने केली आहे. काहींचा भाजल्याने तर काहींचा गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. तळमजल्यावर कार दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या ठिकाणी सात ड्रममध्ये ज्वलनशील रसायने ठेवण्यात आली होती. ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवले होते. मात्र, या ड्रमला आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अशी रसायने निवासी भागात ठेवण्यास परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे.

त्याने अशी घातक रसायने साठवून ठेवली नसावीत. जोपर्यंत कोणी तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत कोणावरही कारवाई करता येणार नाही, असे ते म्हणाले. आग इतकी भीषण होती की पाण्याने ती विझवणे कठीण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही वेळातच अपार्टमेंटजवळील एका दुकानालाही याचा फटका बसला. मात्र, दुकानात कोणाचाही मृत्यू झाला नाही.