शिंदेंनी केला मोठा गेम, ‘या’ बड्या नेत्याला पक्षात घेत वाढवलं सगळ्याच पक्षांचं टेंशन

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. अनेक नेते हे या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याआधीच शिवसेनेमध्ये इनकमिंग झाल्याचे दिसून आले आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राहुल कलाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचा शिंदेंच्या गटाला मोठा फायदा होणार आहे.

राहूल कलाटे यांच्यासोबतच काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. नवनाथ जगताप, संपतअप्पा पवार, अश्विनी वाघमारे यांनी राहूल कलाटेंसोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच आणखी काही नगरसेवकही शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले होते. त्यामुळे चिंचवडच्या पोटनिवडणूका घेण्यात आल्या होत्या. या निवडणूकीत भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आले होते. तर अपक्ष म्हणून राहूल कलाटे हे मैदानात उतरले होते.

आधी शिवसेनेमध्ये असलेले राहूल कलाटे यांना ही निवडणूक लढायची होती. पण ही जागा राष्ट्रवादीने घेतली. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना ही उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे राहूल कलाटे हे अपक्षच निवडणूकीत उतरले होते. तसेच या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात त्यांना मतंही मिळाली पण त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला.

दरम्यान, चिंचवडच्या पोटनिवडणूकीत अश्विनी जगताप, राहूल कलाटे आणि नाना काटे यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये अश्विनी जगताप यांना १,३५,६०३, राहूल कलाटे यांना ९९,४३५ आणि नाना काटे यांना ४४,११२ मतं मिळाली होती.