Rohit sharma : काल टीम इंडियासाठी मोठा दिवस होता. यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ७० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंड भारताला तगडी स्पर्धा देत होता. त्याचे दोन फलंदाज खेळपट्टीवर सेट झाले होते. यामुळे हा विजय सुखर नव्हता.
असे असताना ड्रिंक्स ब्रेक झाला आणि असं काही घडलं की भारताने पुनरागमन करण्यास सुरुवात केली. यामुळे यामध्ये नेमकं काय घडलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ड्रिंक ब्रेकमध्ये रोहित शर्माने एकाही खेळाडूला आराम करण्याची संधी दिली नाही. त्याने ताबडतोब सर्वांना चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले.
यावेळी रोहित काही वेळ आपलं मत मांडताना दिसला. त्याच्या पेप टॉकनंतर खेळाडू आपापल्या ठिकाणी परत गेले. यानंतर खेळ बदलत गेला. मोहम्मद शमीने केन विल्यमसन आणि टॉम लॅथमला एकाच षटकात बाद केले. वेगाने धावा काढणारा किवी संघ बॅकफूटवर आला. यामुळे विजय सुखर झाला.
ड्रिंक्स ब्रेकपूर्वी अनेक चूका झाल्या. झेल सुटत होते. ड्रिंक्स ब्रेकनंतर क्षेत्ररक्षकही पूर्वीसारखा अचूक काम करताना दिसला. गोलंदाजाने अतिरिक्त धावा देणेही बंद केले. यामुळे इथेच सगळी गेम फिरली. यामुळे टीम इंडिया तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.
भारतीय संघ चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावा केल्या. यामुळे याचा पाठलाग करणे न्यूझीलंडला अवघड झाले.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने या समन्यात सर्वाधिक अफलातून कामगिरी करत ७ विकेट्स घेतल्या. यामुळे टीमचा विजय सोप्पा झाला. आता फायनलमध्ये काय होणार हे लवकरच समजेल.