Rohit Sharma : टिमच्या विजयाचे श्रेय कोणाला? रोहित शर्माने ‘या’ खेळाडूचे नाव केले पुढे, भावूक होत म्हणाला…

Rohit Sharma : काल झालेल्या क्रिकट विश्चचषक उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. यामुळे भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावा केल्या आणि अशा प्रकारे विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला. 

भारताने २०१९ च्या विश्वचषकातील सेमीफायनलचा भारताने विश्वचषक २०२३ मध्ये बदल घेतला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, सामन्यात खराब क्षेत्ररक्षण करूनही आपल्या संघाने संयम गमावला नाही. मी इथे खूप क्रिकेट खेळलो आहे, या मैदानावर कितीही धावसंख्या असली तरी तुम्ही निवांत राहू शकत नाही.

आम्हाला आमचे काम पूर्ण करायचे होते आणि रणनितीप्रमाणे कामगिरी करायची होती. आमच्यावर दबाव असेल याची आम्हाला कल्पना होती. मैदानावर खराब क्षेत्ररक्षण करूनही आम्ही संयम गमावला नाही.रोहितने सामन्यातील पुनरागमनाचे श्रेय मोहम्मद शमीला दिले.

तसेच त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेलने लक्ष्याचा शानदार पाठलाग केल्याबद्दल कौतुक केले. विल्यमसन आणि मिशेल यांनी शानदार फलंदाजी केली. एक वेळ अशीही आली की, प्रेक्षकवर्गही शांत झाला होता, पण आम्हाला कळले की आम्हाला झेल किंवा धावबाद करण्याची गरज होती. अशा परिस्थितीत शमीने शानदार गोलंदाजी केली.

आता टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे. याबाबत संघाचे अव्वल पाच-सहा फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. जेव्हा-जेव्हा त्यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी त्याचा फायदा घेतला. अय्यरने या स्पर्धेत संघासाठी जी कामगिरी केली आहे ती कौतुकास्पद आहे.

तसेच गिलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती अप्रतिम होती. दुर्दैवाने त्याला क्रॅम्प्समुळे संघाबाहेर जावे लागले. कोहलीने तेच केले ज्यासाठी तो ओळखला जातो. त्याने आपले ऐतिहासिक शतकही पूर्ण केले, असे म्हणत रोहितने संघाचे कौतुक केले आहे.