BARC Gang Rape : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) क्वॉर्टरमधील फ्लॅटमध्ये एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (BARC Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नामांकीत आणि अत्यंत सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या संस्थेतही महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पीडित मुलगी वाणिज्य शाखेत शिकते. ती आपल्या आई आणि बहिणीसोबत पालघर जिल्ह्यात राहते. तिचे वडील बीएआरसी (BARC) मध्ये कामाला आहेत.
एका फ्लॅटमध्ये तिचे वडील राहात असत. या ठिकाणीच ती तिच्या वडिलांना भेटण्यास आली होती. आरोपींपैकी अजित कुमार यादव पीडितेला ओळखत होता. अजित कुमार हा हा BARC कर्मचार्यांचा मुलगा आहे. अजितचे आई-वडील एका रात्रीसाठी बाहेर गेले होते. त्यामुळे तो घरात एकटाच होता.
त्याचा फायदा घेत त्याने त्याचा मित्र प्रभाकर यादव याला घरी बोलावून घेतले. पीडिता स्वयंपाचे साहित्य घेण्यासाठी अजित याच्या घरी गेली होती. या वेळी अजित यादव आणि प्रभाकर यादव या दोघांनी मिळून तिला शीतपेयाची बाटली दिली.
यानंतर ती बेशुद्ध झाली. त्याचाच फायदा घेत दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. साडेबाराच्या सुमारास मुलगी शुद्धीवर आली असता तिला घडला प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने आपल्या फ्लॅटकडे धाव घेतली. तसेच, तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती तिने आपल्या जवळच्या लोकांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.