Gautam Singhania : रेमंड ग्रुपचे एमडी आणि अब्जाधीश उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्यावर त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. गौतम सिंघानिया आणि नवाज सिंघानियाचे घटस्फोट प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे.
नवाजने आपल्या दोन मुली निहारिका आणि न्यासा यांच्यासाठी 11 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीतील 75 शेअर्सची मागणी केली आहे. आता नवाज मोदी यांनी सिंघानिया यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे.
दिलेल्या मुलाखतीत नवाजने त्यांच्या लग्नाविषयी सांगितले, ज्यामध्ये तिने अनेक मोठे खुलासे केले. 13 नोव्हेंबर रोजी गौतम आणि नवाज यांनी 32 वर्षांच्या लग्नानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. नवाज सिंघानिया यांनी मुलाखतीत एका घटनेचा उल्लेख केला आहे.
गौतमने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तिने सांगितले. नवाज मोदी सिंघानिया म्हणाली, ‘9 सप्टेंबरला गौतमच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेचे 5 वाजले होते. गौतमने माझी मुलगी निहारिका आणि मला मारहाण केली, लाथ मारली आणि धक्काबुक्की केली.
सुमारे 15 मिनिटे त्याने हे केले. त्यानंतर अचानक तो तेथून गायब झाला. मला वाटले की तो त्याची बंदूक किंवा काही शस्त्र घेण्यासाठी गेला असावा. नवाजने सांगितले की तिने तिच्या मुलीला सुरक्षितपणे दुसऱ्या खोलीत नेले आणि नंतर तिच्या पाठीला आधार देण्यासाठी टॉवेल घेण्यासाठी गेली.
नवाज सिंघानियाने सांगितले की, तिच्यावर दोनदा हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. एकदा गर्भधारणेदरम्यान हर्नियाचे ऑपरेशन केले गेले आणि दुसरे म्हणजे एक्टोपिक गर्भधारणेदरम्यान जेव्हा तिची फॅलोपियन ट्यूब काढली गेली.
नवाज मोदी सिंघानिया यांनी सांगितले की, गौतम सिंघानिया यांनी बाथरूम वापरल्याबद्दल नवाजला मारहाण केली कारण गौतम सिंघानिया यांना त्यांची शक्ती आणि नियंत्रण दाखवायचे होते, त्यामुळे त्यांनी असे केले. नवाजने सांगितले की, गौतम सिंघानिया यांना बाथरूम वापरायचे होते आणि ती आधीच आत होती. नवाजने सांगितले की, बेडरुमसोबत आणखी दोन बाथरूम आहेत आणि संपूर्ण 39 मजली इमारत बाथरूमने भरलेली आहे, पण गौतम सिंघानिया यांना आपली शक्ती आणि नियंत्रण दाखवायचे होते, त्यामुळे त्यांनी असा हल्ला केला.
नवाज सिंघानिया यांनी सांगितले की, त्यांची मैत्रिण अनन्या गोयंका हिने या घटनेदरम्यान तिला मदत केली होती. अनन्याने सांगितले की पोलिसही त्यांच्या मदतीला येणार नाहीत कारण गौतम हे होऊ देणार नाही.
त्यांचा आरोप आहे की गौतमनेच निहारिकाला सांगितले की पोलिस तिला मदत करणार नाहीत. दरम्यान, निहारिकाने त्रिशाकर बजाज यांचा मुलगा विश्वरूप यालाही फोन केला. त्रिशाकर बजाज आणि गौतम सिंघानिया हे चुलत भाऊ आहेत.
नवाज मोदी सिंघानिया यांनी सांगितले की, गौतम सिंघानिया उद्योगपती अतुल्य मफतलालला आपला सुपरहिरो मानतात आणि त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वर्षी अतुल्य मफतलाल यांचे निधन झाले. नवाजने सांगितले की, अतुल्य देखील आपल्या पत्नीला मारहाण करत असे आणि गौमत सिंघानिया देखील आपल्या पत्नीशी अशाच प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात.