भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोमय्यांच्या या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक आरोपही होताना दिसत आहे.
या व्हिडिओची आता पावसाळी अधिवेशनातही चर्चा झाली आहे. या व्हिडिओवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे.
किरीट सोमय्या यांनी महिलांचा गैरफायदा घेतला आहे. त्यांच्या अनेक क्लिप्स माझ्याकडे आहे. माझ्याकडे त्यांच्या ८ तासांच्या क्लिप्स आहेत. त्यामध्ये ते महिलांवर दबाव टाकून गैरफायदा घेताना दिसून येत आहे, असे अंंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
आपलं राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांचं राज्य आहे. जिजाऊ, अहिल्यादेवी आणि सावित्रीमाईंच्या या राज्यात महिलांवर अन्याय होत आहे. ईडी, सीबीआयची भिती दाखवत महिलांना ब्लॅकमेल केलं जातंय, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
भाजप पक्षातील महिलांना पक्षात पद देतो, महामंडळ देतो. माझा ईडीच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहे, असे म्हणत ते महिलांचा गैरफायदा घेताय. ते त्यांना राज्यसभा, विधानपरिषदेमध्ये स्थान देतो म्हणत महिलांचा गैरफायदा घेता, असे म्हणत अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.
जो पक्ष नैतिकतेचे धडे देतो त्याच पक्षातील लोक अशी वागत आहे. पण असं वागणारी व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे. हे महत्वाचं नाही. तर हा गुन्हा किती गंभीर आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. त्यांनी सभागृहात पेनड्राईव्ह सुद्धा आणला होता. त्यांनी तो पेनड्राईव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला आहे.