IPL 2024 : हार्दीक पांड्या मुंबईकडे येणार आणि रोहीत शर्मा गुजरातला जाणार? IPL मध्ये मोठ्या घडामोडी

IPL 2024 : हार्दिक पंड्या आयपीएलमधील एक मोठा खेळाडू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याचा नवा फॉर्म पाहायला मिळत आहे. IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स या नवीन संघाने हार्दिकला आपला कर्णधार बनवले आणि त्याने पहिल्या सत्रातच आपल्या संघाला चॅम्पियन बनवले.

हार्दिकच्या कर्णधारपदाने जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांना आश्चर्यचकित केले होते. हार्दिकने आयपीएलमध्ये शानदार कर्णधारपद भूषवले. पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी होऊ शकते. तर रोहित शर्मा गुजरात टायटन्समध्ये सामील होऊ शकतो.

असे असताना हार्दिक पांड्याने गुजरात संघ सोडण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हार्दिक पांड्या पुन्हा मुंबईला जाऊ शकतो अशा बातम्या पसरत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांनुसार, गुजरात टायटन्स हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्ससोबत ट्रेड करू शकते. यासाठी तो स्वॅप वापरू शकतो आणि हार्दिक पांड्याला मुंबई इंडियाच्या जोफ्रा आर्चरसोबत स्वॅप करू शकतो.

या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, परंतु असे बोलले जात आहे की हार्दिक पांड्या आणि जोफ्रा आर्चर यांची गुजरात आणि मुंबई दरम्यान अदलाबदल केली जाऊ शकते. हे करणे सोपे होणार नाही, कारण हार्दिक पांड्याला गुजरातने १५ कोटी रुपयांमध्ये संघात समाविष्ट केले होते, तर मुंबईने जोफ्रा आर्चरसाठी ८ कोटी रुपये खर्च केले आहेत.

असे असताना मुंबई इंडियन्सच्या खिशात फक्त ५० लाख रुपये शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, जोफ्रा आर्चरची अदलाबदल करूनही हार्दिक पांड्याला संघात समाविष्ट करणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे.

IPL ट्रेडची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर आहे, त्यामुळे हार्दिक पांड्या कोणत्या संघात आहे हे दोन दिवसांनी कळेल. मात्र याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.