Gujarat Titans : आयपीएल (IPL सीझन 17) च्या 17 व्या हंगामासाठी लिलावापूर्वी, संघांनी त्यांचे काही खेळाडू कायम ठेवले आणि काही रिलीज केले आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या एका दिवसात गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे.
वास्तविक, जीटीने गुजरातचा युवा खेळाडू उर्विल पटेलला सोडले आहे, ज्याने एका दिवसानंतर उर्विलने 41 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावून गुजरात टायटन्सचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. उर्विलने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ही कामगिरी केली आहे.
यासह त्याने दिग्गज फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनाही मागे टाकले आहे. अरुणाचल प्रदेश आणि गुजरात यांच्यातील विजय हजारे ट्रॉफीच्या गट डी सामन्यात उर्विल पटेलने तुफानी शतक झळकावले.
हा सामना चंदीगडमध्ये खेळला जात होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अरुणाचल प्रदेश संघाला 35.1 षटकात केवळ 159 धावा करता आल्या. त्यानंतर 160 धावांचं आव्हान पेलायला आलेल्या गुजरात संघानं 2 गडी गमावून 13 षटकांत हे लक्ष्य गाठलं.
गुजरातकडून यष्टीरक्षक फलंदाज उर्विल पटेलने अवघ्या 41 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. उर्विलचे लिस्ट ए कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.
उर्विल भारतातील लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. सूर्य कुमार यादवचा विक्रम मोडत तो सर्वात जलद शतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
त्याच्याआधी अष्टपैलू युसूफ पठाण बडोद्याकडून खेळताना अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावून यादीत पहिल्या स्थानावर आहे. तर अभिषीत शर्मा आणि सूर्यकुमार यादव ४२ आणि ५० चेंडूत शतके झळकावून यादीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.