Cricket : ९.४ ओव्हर्स, ० रन अन् ८ विकेट्स; क्रिकेटजगताला मिळाला नवा मुरलीधरन! भेदक स्पेलनं एकच खळबळ

Cricket : जगातील लोकप्रिय खेळांपैकी एक असलेल्या क्रिकेटचा गेल्या काही वर्षांत प्रचंड विस्तार झाला आहे. त्यामुळेच येथे दररोज काही ना काही विक्रम होतात आणि मोडले जातात. सोशल मीडियावर दररोज काही ना काही खेळाडू त्याच्या टॅलेंटमुळे रातोरात स्टार बनतात.

काल असाच एक विक्रम प्रस्थापित झाला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक सामन्यादरम्यान एका गोलंदाजाने 9.4 षटके टाकली. यादरम्यान त्याने एकही धाव न देता आठ विकेट घेतल्या.

कोण आहे हा गोलंदाज आणि कोणत्या सामन्यात हा इतिहास रचला गेला, चला जाणून घेऊया सविस्तर. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन गेल्यानंतर त्याच्यासारखा दुसरा गोलंदाज येणार नाही, असे बोलले जात होते.

मात्र, अलीकडेच एका गोलंदाजाने असा पराक्रम केला, ज्यानंतर लोक त्याला दुसरा मुरलीधरन म्हणत आहेत. खरं तर, श्रीलंकेच्या शालेय क्रिकेटमध्ये सेल्वासेकरन ऋषियुधन नावाच्या 10 वर्षीय गोलंदाजाने 9.4 षटकात एकही धाव न देता आठ विकेट घेतल्या.

या युवा खेळाडूने या कालावधीत 9 मेडन षटके टाकली. या डावखुऱ्या ऑफस्पिन गोलंदाजाने आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. यानंतर हा “आश्चर्यकारक” क्रिकेटर सोशल मीडियावर खूप वेगाने ट्रेंड करू लागला.

काल, श्रीलंकेतील एका शाळेत 13 वर्षांखालील विभाग दोन आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत हिंदू कॉलेज बंबालापिटिया आणि M.D.H जयवर्धने MV बथरमुल्ला यांच्यात सामना झाला. यावेळी सेल्वासेकरन ऋषियुधनने क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला, त्यानंतर त्याची तुलना महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनशी होऊ लागली.

त्याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे त्याच्या संघ हिंदू कॉलेजने M.D.H जयवर्धनेच्या संघाचा पराभव केला. प्रथम खेळताना हिंदू कॉलेजने 9 विकेट्सवर 126 धावा करून डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात एमडीएचचा संपूर्ण संघ 28 धावांत गारद झाला.