Fraud : डॉक्टर असल्याचं सांगून केलं लग्न, तो निघाला डिलिव्हरी बॉय; तरूणीने असं काही केलं की…

Fraud : फसवणूक करून लग्न करणे अशी प्रकरणे आजकाल खूप समोर येत राहतात. अशा प्रकारात काही वेळा वराची बाजू फसवणुकीचा बळी ठरते तर काहीवेळा वधूपक्षाला अशा फसवणुकीच्या प्रकरचा सामना करावा लागतो.

अशाच एका प्रकरणात एमबीबीएस डॉक्टर असल्याचे भासवून एका डिलिव्हरी बॉयने पेशाने वकील असलेल्या एका महिलेला आपल्या जाळ्यात अडकवले आहे. त्याने स्वत:ला एमबीबीएस डॉक्टर असल्याचे घोषित केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

फसवण्यासाठी त्याने डॉक्टरांच्या गणवेशातील फोटो मॅट्रिमोनिअल साइटवर टाकला होता. त्याच्या गळ्यात स्टेथोस्कोपही होता आणि ते पाहून ती त्याच्या फसवणुकीची बळी ठरली.

या लग्नावर कुटुंबीयांनी अंदाजे 15 लाख रुपये खर्च केले होते. लग्नानंतर तरुणाचे शिक्षण फार कमी असल्याचे समोर आले आणि Zomato मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचे समजले.

या मुलीने वन स्टॉप सेंटरकडे तक्रार करून सांगितले की, त्याचे सत्य समोर आल्यानंतरही तिने हृदयात दगड ठेऊन हा विश्वासघात आपल्या नशिबी असल्याचे समजून सहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा त्याचे रहस्य उघड झाले तेव्हा त्याने आपले खरे रेंग दाखवायला सुरुवात केली.

क्षुल्लक कारणावरून त्याने मारहाण सुरू केल्याचा आरोप मुलीने केला आहे. जेव्हा दोघांमधील भांडण वाढले आणि पाणी डोक्यावरून जाऊ लागले, तेव्हा तिने वन स्टॉप सेंटरमध्ये येऊन तक्रार केली. समुपदेशक अंजना चौहान यांच्या म्हणण्यानुसार, 2021 मध्ये मुलीचे लग्न झाले होते.

भांडण इतके वाढले की चार समुपदेशनानंतरही तडजोडीला वाव नसताना विजयनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. वन स्टॉप सेंटरच्या मॅनेजर प्रीती मलिक यांनी सांगितले की, येथील बहुतांश केसेस घरगुती हिंसाचाराच्या आहेत.

यापैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे अशी आहेत ज्यात महिला दीर्घकाळापर्यंत हिंसाचार शांतपणे सहन करत आहेत. अशी काही प्रकरणे आहेत ज्यात महिलांना कायदेशीर कारवाई हवी असते पण त्यांचे पालक त्यांना साथ देत नसतील तर त्यांना माघार घ्यावी लागते. पण, हळूहळू परिस्थिती बदलत आहे.